रहिवाशी पुराव्याशिवाय अशा प्रकारे मिळवू शकता एलपीजी गॅस कनेक्शन


नवी दिल्लीः केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत एक कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन देणार आहे. मोफत एलपीजी कनेक्शन सर्व गरीब कुटुंबांना देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे रहिवासाचा कोणताही पुरावा नसताना आता सरकार एलपीजी कनेक्शन देत आहे. याव्यतिरिक्त लोकांना त्यांच्या आसपासच्या तीन डीलर्सकडून रिफील सिलिंडर मिळण्याचा पर्याय उपलब्ध होईल. पण या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सरकार या योजनेंतर्गत घरगुती स्वयंपाक गॅस किंवा एलपीजी कनेक्शन देत आहे. चार वर्षांत गरीब महिलांच्या घरात 8 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.

बीपीएल कुटुंबांना या योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शनसाठी 1600 रुपये मिळतात. प्रति कनेक्शन 1600 रुपये किमतीत सिलिंडर, प्रेशर रेगुलेटर, बुकलेट, सेफ्टी हाऊसेस इत्यादींचा समावेश आहे. याचा सगळा खर्च सरकार उचलते. ग्राहकांना फक्त स्टोव्ह स्वत: खरेदी करावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे करु शकता अर्ज

  • बीपीएल कुटुंबातील कोणतीही महिला गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज करू शकते
  • मोफत एलपीजी कनेक्शन मिळविण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या संकेतस्थळावरून फॉर्म डाऊनलोड करा.
  • नो योर कस्टमर म्हणजेच केवायसी फॉर्म नजीकच्या एलपीजी केंद्रात जमा करावा लागेल
  • यासाठी जनधन बँक खाते क्रमांक, घरातील सर्व सदस्यांचा खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि तपशिलानुसार घराचा पत्ता आवश्यक असेल.
  • गॅस कनेक्शनसाठी निवासी पुरावा आवश्यक नाही.
  • आपल्याला 14.2 किलो सिलिंडर घ्यायचा आहे किंवा ते 5 किलो लहान घ्यायचा आहे, ते फॉर्ममध्ये द्यावे लागेल.