पुण्याच्या महापौरांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप


पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज 8 वाजल्यापासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी तशी घोषणा देखील केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील स्थिती विदारक बनत चालली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनत चालले आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी जोरदार टीका केली आहे.

पुण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन झोपी गेले आहे का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला आहे. सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर्सचा पुणे शहरात मोठा तुटवडा भासत आहे. आम्ही रोज मागणी करत आहोत. पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केला आहे. पुणे शहराला रेमडेसिव्हीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात लागत आहे. हे माहिती असतानाही पुरवठा केला जात नाही. रेमडेसिव्हीर आणि व्हेंटिलेटर संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.