उद्यापासून 15 दिवस निर्बंधादरम्यान काय सुरु आणि काय बंद?


मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती चिंताजनक झाल्यामुळे राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याची घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या पंधरा दिवसांत कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर या काळात सर्वसामान्य गटातील नागरिकांसाठी मदत जाहीर केली आहे.

राज्य सरकारच्या ब्रेक द चैन! संदर्भात हे आहेत निर्बंध?

 • उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.
 • मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.
 • उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम लागू.
 • पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी.
 • अनावश्यक बाहेर फिरणे टाळवे.
 • विनाकारण घराबाहेर बाहेर पडू नये.
 • अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील.
 • अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते रात्री 8 सुरु राहतील.
 • अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल, बस सुरु राहतील.
 • जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
 • पावसाळी पूर्व कामे सर्व सूरू राहतील.
 • अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.
 • हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.
 • रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची सुविधा.
 • 7 कोटी लोकांना एक महिना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ मोफत.
 • शिवभोजन ताळी 5 रुपयांवरुन 10 रुपयांवर केली.