कोल्हापूर – महाराष्ट्र सरकारला या संकट काळात केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. महाराष्ट्राला कोरोनामुळे निर्माण होत असलेला हा बोजा झेपवणारा नाही. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असल्यामुळे बाकीच्या राज्यांसोबत महाराष्ट्रालाही मदत झाली पाहिजे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारला केली आहे.
खासदार संभाजीराजेंची केंद्राकडे महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी
यावेळी संभाजीराजे यांनी सांगितले की, कोणत्याही पक्षाला माणसाचे आयुष्य बांधील नाही. वेगवेगळी क्षेत्र राजकारण करायला असल्यामुळे यात कोणतेही राजकारण केंद्र आणि राज्य सरकारने करू नये. जास्त कोरोना प्रादुर्भाव असलेल्या राज्यांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
या परिस्थितीत लॉकडाऊन हा पर्याय नाही. तरीही लॉकडाऊन करणार असाल तर, अनेक घटकांसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. सर्वसामान्यांना पहिला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. दुसरा फटका त्यांना बसला तर ते बाहेर पडू शकणार नसल्याचेही संभाजीराजे यावेळी म्हणाले आहे.