आयपीएल मध्ये ३५१ षटकार ठोकणारा क्रिस गेल एकमेव फलंदाज

आयपीएल २०२१ मध्ये राजस्तान रॉयल्स विरुद्ध खेळताना पंजाब किंग्जच्या तुफानी फलंदाज क्रिस गेलने नवा विक्रम नोंदविला आहे. आयपीएल मध्ये ३५१ वा षटकार ठोकणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज बनला आहे. सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर झालेल्या या सामन्यात पंजाब संघ विजयी झाला. त्याने २८ चेंडूत ४० धावा काढल्या, त्यात २ षटकार आणि ४ चौकार आहेत.

या सामन्यापूर्वी क्रिसला ३५० वा षटकारसाठी एकच षटकार गरजेचा होता. त्याने बेन स्टोकच्या गोलंदाजीवर पहिला षटकार ठोकून ३५०चा आकडा गाठला. त्यानंतर त्याने आणखी एक षटकार ठोकला. टी २० मध्ये १००० षटकार ठोकणारा क्रिस एकमेव फलंदाज आहे. आयपीएल मध्ये त्याच्या ४८०० पेक्षा जास्त धावा झाल्या असून सनरायझर्स हैद्राबादच्या डेव्हिड वॉर्नर नंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा परदेशी खेळाडू आहे. वॉर्नरने ५२५४ धावा केल्या आहेत.

भारतीय खेळाडूंचा विचार केला तर आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार धोनी २१६, रोहित शर्मा २१४, विराट कोहली २०१ असे आहेत.