ट्रेड मिलवर धावू नका, दुखापतींना दूर ठेवा

आपले वजन कमी करावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. मग त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे जॉगिंग. पावसात किंवा प्रदूषणात जॉगिंगला बाहेर कुठे जायचे म्हणून आजकाल ’ट्रेड मिल’वर घरच्या घरी व्यायाम करण्याचा प्रघात वाढला आहे, परंतु ट्रेड मिल’वर चालल्याने तुम्हाला गुडघेदुखीचे विकतचे दुखणे भोगावे लागण्याची शक्यता अधिक असल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.

गुडघ्याचे स्नायू शरीरातील सर्वांत मोठे आणि अवघड रचना असलेले स्नायू असतात. त्यांच्यावर संपूर्ण शरीराचे वजन पेलण्याची जबाबदारी असते. ज्यांचे गुडघ्याभोवतीचे स्नायू कमजोर असताना त्यांना ट्रेड मिलवर व्यायाम करताना स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. ट्रेड मिलवर दीर्घकाळ वेळ घालविल्याने कायमस्वरूपी गुडघ्याची वाटी दुखावण्याची शक्यता जास्त असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बसल्या जागी काम करणार्‍यांचे वजन प्रचंड वाढते. त्यामुळे व्यायाम करण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु बाहेर जाऊन जॉगिंग करणे सर्वांना वेळखाऊ वाटते आणि मग त्यातून मध्यम मार्ग निवडला जातो.

ट्रेड मिल जाड्या व्यक्तींसाठी नाहीतट्रेड मिल नवख्या व्यायाम करणार्‍यांसाठी बनविलेले नसतात. ते मुळातच फीट लोकांच्या वजनानुरूप बनविलेले असतात. वजन जास्त असणार्‍या आपल्या देशातील लोकांसाठी त्याची रचना सोयिस्कर नसते. मग दुखापतींना आपोआप निमंत्रण मिळते.

– या गोष्टींची काळजी घ्या

ज्यांना आपले वजन कमी करायचे असेल त्यांनी सायकलिंग किंवा पोहण्याचा व्यायाम करावा. जर बाहेर जॉगिंगला जायचे असेल तर चांगल्या प्रतीचे धावण्याचे स्पोर्टस् शूज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विकत घ्यावेत.कोणताही व्यायाम करण्यापूर्वी शरीराची हलकी हालचाल करून ’वॉर्मअप’ करावे. हलकी पावले टाकून सुरुवात करावी, त्यामुळे गुडघ्यांच्या स्नायूंची दुखापत टळते.चांगले आरामदायक इनसोल असलेले बूट वापरावेत. तुमच्या पायाचा आकार पसरट असेल तर चवडा दुमडला जाणार नाही त्याला चांगली कुशन मिळेल असे बूट वापरा.३५ वर्षांवरील व्यक्तींनी ट्रेड मिल वापरताना काळजी घ्यावी. एकाच गुडघ्यावर संपूर्ण शरीराचा भार देणे टाळावे.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment