१२ एप्रिल रोजी होणारा कोकण विभागीय लोकशाही दिन रद्द


नवी मुंबई :- सध्या राज्यात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील 4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये राज्यात 5 एप्रिल 2021 पासून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.

लोकशाही दिनाच्या बैठकीस मोठ्या संख्येने अर्जदार व विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित असतात. अशा वेळी कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने दि.4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येऊन सोमवार 12 एप्रिल 2021 रोजी आयोजित केलेला लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे. असे उपायुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग, नवी मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.