‘ही’ लक्षणे आढळल्यास करु नका दुर्लक्ष ! तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे फायदेशीर


मुंबई : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करत आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही वाढ सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देशात दररोज एक लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणे जाणून घेणे आणि यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आली, तर तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 1.28 कोटींहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. तसेच देशात सध्या 8.87 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त 1.66 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दुसरीकडे 1.18 कोटींहून अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट देशात आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अत्यंत घातक असल्याचे सांगितले जात आहे. आता देशातील अनेक राज्यांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच काय आहेत नव्या कोरोनाची लक्षणे ती आपण जाणून घेऊयात.

कोरोनाची मुख्य लक्षणे :

  • ताप
  • कोरडा खोकला
  • थकवा

कोरोनाची इतर लक्षणे :

  • खाज येणे आणि वेदना होणे
  • घशात खवखव होणे
  • जुलाब
  • डोळे येणे
  • डोकेदुखी
  • चव आणि गंध ओळखणे कठिण होणे
  • त्वचेचे इन्फेक्शन
  • हात आणि पायाच्या बोटांचा रंग बदलणे

कोरोनाची गंभीर लक्षणे :

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • दम लागणे
  • छातीत दुखणे
  • बोलताना किंवा चालता-फिरताना त्रास होणे