चंद्रकात पाटील यांनी केली अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून गौप्यस्फोट केला आहे. मीडियाला 3 पानांचे पत्र सचिन वाझेने शेअर केले आहे. त्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये मागितल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. त्यानंतर, परब यांच्या राजीनाम्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मागणी केली आहे.

दरम्यान न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यास NIA कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझेने मीडियाला 5 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कथित पत्र 5 पानांचे असून महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव सचिन वाझेने आपल्या पत्रात घेतले आहे. आपल्याला खंडणी वसूल करायला अनिल परब यांनीही सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी पत्रातून केला आहे. त्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून चंद्रकात पाटील यांनी ट्विट करुन अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, आता राजीनाम्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पहायची का? असा टोलाही त्यांनी लगावला.