करोनाने या राष्ट्रप्रमुखांची प्रतिमा उजळली तर काहींची मलीन केली

जगभरात करोना विष्णुने १३.१९ कोटी लोकांना वेढले आहे तर २७.६७ लाख लोकांना मृत्यू आला आहे. करोनाचे नियंत्रण करताना अनेक देशांची सरकारे अडचणीत आली असल्याचे दिसून येत आहे. या साथीने काही नेत्याची प्रतिमा उजळली तर काही प्रमुख नेत्यांची प्रतिमा मलीन झाल्याचेही दिसून येत आहे. जगाची महासत्ता अमेरिकेत करोनाच्या पहिल्या लाटेत तत्कालीन राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प पूर्ण नापास झाले तर करोना संक्रमणात दोन नंबर वर असलेल्या ब्राझील मध्ये चार वेळा आरोग्य मंत्री बदलण्याची पाळी आली.

स्पेन, जपान, फ्रांस, जर्मनी देशाच्या प्रमुखांची प्रतिमा करोनाने मलीन केली. त्या देशातील विरोधी पक्ष आणि जनतेने त्यांच्या देश प्रमुखांच्या कामगिरी बाबत सक्त नाराजी व्यक्त केळी. इटली मध्ये तर पंतप्रधान बदलण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड, द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, तैवान, भारत आणि चीन या देशांनी मात्र करोनाचा धीराने मुकाबला केला. या देश प्रमुखांची प्रतिमा अधिक सशक्त बनली.

फ्रांसमध्ये ईमॅन्यूअल मँक्रो यांची लोकप्रियता घटून २९ टक्क्यांवर आली तर जपान मध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान योशिहिदे सुगा खुपच दबावाखाली आले. तेथील जनतेने सुगा यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचीही लोकप्रियता घटली आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेल मर्केल यांची लोकप्रियता घटून २२ टक्क्यावर आल्याचे सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.

या उलट न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्दन यांनी जगापुढे आदर्श ठेवला आहे. १४ डिसेंबरला न्यूझीलंड करोना मुक्त झाल्याचे जाहीर केले गेले आहे. द.आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रोमोफेसा यांनी देशात कडक नियम जारी करून जनतेला सुखरूप ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. या देशात करोनाची दुसरी लाट पार झाली आहे. ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी वेगाने जनतेचे लसीकरण केल्याने त्यांची प्रतिमा उजळली आहे. ब्रिटन मध्ये आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाही नागरिकाचा करोनाने मृत्यू झालेला नाही.

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू याना बहुमत नाही. मात्र तरीही ते देशाचे विश्वासार्ह नेते आहेत. त्यानीही जगात सर्वाधिक वेगाने करोना लसीकरण मोहीम राबविली असून इस्रायल मध्ये ६० टक्क्यांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सक्त लॉकडाऊनचा निर्णय घेतलाच पण गावी परतणारे मजूर, गरिबांना रेशन, वेळोवेळी आर्थिक मदत पॅकेज जाहीर करून देश रुळावर ठेवला. शिवाय अन्य देशांना सुद्धा औषधे, करोना चाचणी उपकरणे यांची मदत केली. आता तर जगातील अनेक देशांना करोना लस पुरविण्याचे काम भारत करत असल्याने मोदी यांची वेगळी प्रतिमा जगासमोर तयार झाली आहे. भारतात सध्या करोनाची दुसरी लाट असून संसर्गाचे प्रमाण खूप असले तरी मृत्युदर कमी आहे. शिवाय वेगाने लसीकरण केले जात आहे.