
चेन्नई – यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दारुचा लोगो असलेली टी-शर्ट घालण्यास इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अलीने नकार दिल्यानंतर मोइन अलीला चेन्नई सुपर किंग्सने जर्सीवरुन दारुचा लोगा हटवण्यास मंजूरी दिली आहे. आयपीएलच्या 14व्या मोसमाची येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
मोइन अलीला जर्सीवरुन दारुचा लोगा हटवण्यास चेन्नई सुपर किंग्सने दिली मंजूरी
यंदाच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या जर्सीमध्ये बदल केला आहे. टीमच्या स्पॉन्सर्सपैकी एक SNG 10000 चेन्नईमधील दारू बनवणारी कंपनी आहे. मोइनने आपल्या जर्सीवर या कंपनीचा लोगो लावण्यास नकार दिला होता.
ऑलराउंडर मोइन अलीला 7 कोटी रुपयांमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने 14व्या सीजनसाठी खरेदी केले आहे. मागच्या सीजनमध्ये मोइन विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम रॉयल चॅलेंर्स बंगळुरूकडून खेळला होता.
इस्लाम धर्माचे मोइन पालन करतो. इस्लाम धर्मात दारू पिणे, बनवणे आणि प्रचार करणे पाप मानले जाते. हाशिम अमला आणि परवेज रसूलनेही यापूर्वी आपल्या जर्सीवर दारूचा लोगो लावण्यास नकार दिला आहे. हाशिम अमलाने साऊथ आफ्रीकेच्या नॅशनल टीमच्या जर्सीवर दारुच्या कंपनीचा लोगो लावण्यास नकार दिला होता. तर, 2013 च्या IPL मध्ये परवेज रसूलने पुणे वॉरियरकडून खेळताना दारुचा लोगो लावण्यास नकार दिला आहे.
