आरोग्यास उपयुक्त कुटुचे पीठ

kuttu
मखाने हा लाह्यांप्रमाणे दिसणारा पदार्थ भट्टीमध्ये घालून फुलविला जात असता काही मखाने फुलत नाहीत आणि तसेच टणक राहतात. या टणक राहिलेल्या मखान्यांचे दळून जे पीठ तयार केले जाते त्याला कुटूचे पीठ म्हटले जाते. हे पीठ उपवासाला चालणारे असून, उत्तर भारतामध्ये या पिठाचा वापर विशेष प्रचलित आहे. या पिठाचा वापर आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असून, ज्यांना उष्णतेशी निगडीत विकार आहेत, त्यांनी मात्र या पिठाचे सेवन मर्यादित प्रमाणामध्ये करावयास हवे.
kuttu1
कुटूच्या पिठाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये कर्बोदकांची मात्रा कमी असल्याने व या पिठाचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी असल्याने या पिठाचे सेवन मधुमेहींसाठी आणि ज्यांना लठ्ठ पणा कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे हे पीठ आहे. या पिठाच्या सेवनाने कोलेस्टेरोलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील ‘गुड’ कोलेस्टेरोल वाढवून (एचडीएल), ‘बॅड’ कोलेस्टेरोल (एलडीएल) कमी करणारे हे पीठ आहे.
kuttu2
कुटुचे पीठ ब जीवनसत्व, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, झिंक इत्यादी पोषक तत्वांनी परिपूर्ण असून, यामध्ये प्रथिनेही आहेत. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी या पीठाचे सेवन उत्तम आहे. या पिठाच्या पुऱ्या करून, थालीपीठ करून किंवा पीठामध्ये दुध-साखर मिसळून या पीठाचे सेवन करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment