या देशामध्ये घारी आणि घुबडे करतात राष्ट्रपती भवनाचे कावळ्यांंपासून संरक्षण

owl
सर्वसाधारणपणे कोणत्याही देशाच्या पंत प्रधान किंवा राष्ट्रपतींच्या निवासस्थानाच्या किंवा कार्यालयाच्या संरक्षणाची जबाबदारी अतिशय काटेकोरपणे प्रशिक्षण दिल्या गेलेल्या कमांडो किंवा सैन्यातील अधिकाऱ्यांची असते. मात्र एक देश असा ही आहे, जिथे राष्ट्रपती भवनाच्या संरक्षणाची जबाबदारी घारी आणि घुबडांवर आहे. देशामध्ये राष्ट्रपती भवन, क्रेम्लीन आणि इतर महत्वपूर्ण सरकारी इमारतींच्या संरक्षणासाठी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने घारी आणि घुबडांचे खास दल तयार केले आहे. शिकारी पक्षांचे हे दल १९८४ सालापासून कार्यरत असून सध्या या दलामध्ये दहा हूनही अधिक घारी आणि घुबडे आहेत.
owl1
या शिकारी पक्ष्यांना विशेष पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात असून राष्ट्रपती भवनाच्या आणि इतर सरकारी इमारतींच्या आसपास कावळे फिरकू न देण्याची जबाबदारी या पक्ष्यांची असते. कावळे, कबुतरे यांच्या घाणीमुळे राष्ट्रपती भवन आणि इतर सरकारी इमारती खराब होऊ नयेत यासाठी घारी आणि घुबडांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे समजते. ही सर्व घुबडे आणि घारी, संघीय गारदसेवेमध्ये समाविष्ट आहेत.
owl2
या दलामध्ये एक वीस वर्षीय ‘अल्फा’ नामक घार आणि ‘फाईल्या’ नामक घुबड आहे. यांची खासियत अशी, की राष्ट्रपती भवनाच्या परिसरामध्ये कावळ्यांचा किंवा कबुतरांचा केवळ आवाज जरी आला, तरी या घारी आणि घुबडे इतर पक्ष्यांना त्वरेने पळवून लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतींपासून कावळे आणि कबुतरांना लांब ठेवण्यासाठी विशेष गारद तैनात केले जात असत. पण आता या गार्ड्सच्या ऐवजी घारी आणि घुबडांची मदत घेतली जात आहे. केवळ कावळे आणि कबुतरेच नाही, तर एखादे लहानसे ड्रोन जरी या परिसरामध्ये नजरेस पडले, तर ते ही पाडण्याचे प्रशिक्षण या पक्ष्यांना दिले गेले असल्याचे समजते.

Leave a Comment