राणी एलिझाबेथ करतात दोन वेगवेगळ्या स्वाक्षऱ्यांचा वापर

queen
राणी एलिझाबेथ जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक असून, आज वयाच्या ९२व्या वर्षी देखील ती पूर्वीसारख्या उत्साहाने सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते. आजच्या काळामध्ये देखील अनेक कार्यक्रम, औपचारिक समारंभ, अनेक ठिकाणी द्यावयाच्या असलेल्या भेटी, उद्घाटने, भाषणे इत्यादी कार्यक्रमांमध्ये राणी एलिझाबेथ सातत्याने व्यस्त असते. या सर्व जबाबदाऱ्या राणी मोठ्या निष्ठेने आणि आनंदाने पार पाडीत असते. किंबहुना व्यस्त राहण्याची मनापासून आवड राणीला असून, नागरिकांच्या भेटी घेण्याला, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याला राणीचे नेहमीच प्राधान्य मिळत आलेले आहे.
queen1
राणी एलिझाबेथ ब्रिटनची महाराणी असल्याने अनेक औपचारिक बाबींशी निगडित कागदपत्रांच्या मंजुरीसाठी राणीची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र राणी एलिझाबेथ दोन प्रकारच्या स्वाक्षऱ्या करीत असून, एक स्वाक्षरी औपचारिक कागदपत्रांसाठी तर, एक स्वाक्षरी राणीच्या अत्यंत खासगी स्वरूपाच्या पत्रांमध्ये पहावयास मिळते. औपचारिक कागदपत्रांवर राणीची स्वाक्षरी ‘एलिझाबेथ आर’ अशी असून, यातील ‘आर’चा अर्थ ‘रेजिना’ म्हणजे राज्यकर्ती असा आहे. या स्वाक्षरीच्या खाली राणी नेहमी ठळक रेघही काढत असते. राणी एलिझाबेथने अलीकडेच केलेल्या शेअर केलेल्या पहिल्या वहिल्या इन्स्टाग्राम पोस्ट वरही तिने आपली स्वाक्षरी ‘एलिझाबेथ आर’ अशी केली आहे.
queen2
राणीच्या खासगी, कौटुंबिक,आप्तेष्टांशी केल्या गेलेल्या पत्राव्यव्हरामध्ये राणीची स्वाक्षरी ‘लिलिबेट’ अशी असते. हे एलिझाबेथचे लहानपणापासूनचे टोपणनाव असून, एलिझाबेथने आपल्या आजीला किंवा इतर आप्तेष्टांना लिहिलेल्या पत्रांमध्ये तिची स्वाक्षरी ‘लिलिबेट’ असलेली पहावयास मिळते.

Leave a Comment