स्वतःला कुत्रे समजणारा हा अजब मनुष्य !

dog
कुत्रे हे अतिशय इमानी जनावर आहे. किंबहुना मनुष्याचा सच्चा मित्र या भावानेने कुत्र्याकडे पाहिले जाते. सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी अतिशय प्रेमळ आणि जगाच्या पाठीवर कुठेही सोबत करणारा समजला जातो. इंग्लंडच्या नॉरफोक मधील ग्रेटर मॅनचेस्टर मध्ये राहणाऱ्या काज जेम्स या मनुष्याला कुत्र्यांचे विलक्षण वेड आहे. त्याचे हे वेड इतके वाढले आहे, की आता तो स्वतःलाच कुत्रा समजू लागला आहे. त्याच्या सर्व हालचाली कुत्र्याप्रमाणे आहेतच, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी, की त्याला भेटण्यास जेव्हा त्याचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी येतात, तेव्हा त्यांच्याशी संभाषणही तो कुत्र्या प्रमाणे भुंकून करतो !
dog1
३७ वर्षे वयाच्या जेम्सला आपण मानवी रूपातील कुत्रे असल्याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच त्याच्या हालचाली देखील एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहेत. खास कुत्र्यासाठी म्हणून मिळणाऱ्या बशीतून बिस्किटे खाणे जेम्सला मनापासून आवडते. जेम्सने स्वतःसाठी कुत्र्याचा ‘कॉस्च्यूम’ बनवून घेतला असून, हाच पोशाख परिधान करून जेम्स वावरत असतो. जेम्सने स्वतःसाठी बनवून घेतलेल्या या खास पोशाखाची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये आहे.
dog2
जेम्स हा वास्तविक जीवनामध्ये व्यावसायिक असून ग्रेटर मॅनचेस्टर भागामध्ये जेम्सच्या मालकीचे एक दुकान आहे. या दुकानामध्येही जेम्स कुत्र्याप्रमाणेच वर्तन करीत असून, ग्राहकांनी मागितलेल्या वस्तू जेम्स आपल्या तोंडामध्ये धरून ग्राहकांना आणून देत असतो. जेम्सच्या अशा वागण्यामुळे त्याला अनेकदा लोकांचा उपहास, चेष्टा, क्वचित संतापही सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य समाजामध्ये आपले जगणे कठीण असल्याचे जेम्सचे म्हणणे आहे. जेम्सने आजवरच्या आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले असून, ‘हाऊ टू ट्रेन अ ह्युमन पप’ असे या पुस्तकाचे नाव आहे.

Leave a Comment