१ रूपयाला इडली विकणाऱ्या अम्मांना आनंद महिंद्रांच्या प्रयत्नांमुळे मिळणार स्वतःच्या हक्काचे घर


चेन्नई – आज सकाळी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांचे मन जिंकले आहे. आपल्या ट्विटमध्ये महिंद्रा सुमहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी खुलासा केला की, तमिळनाडुच्या प्रसिद्ध “इडली अम्मा” ज्या दोन वर्षांपूर्वी एक रूपयात इडली बनवून विकत होत्या, त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. या आजींकडे आता स्वतःच्या हक्काचे घर असणार आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दोन वर्षांपूर्वी कमलाथल बद्दल ट्विट केले होते की, “इडली अम्मा” म्हणून ज्या ओळखल्या जातात. त्यांची ही माहिती समोर आल्यानंतर ती देशभर व्हायरल झाली. इडलीसह सांबर आणि चटणी या आजी लोकांना प्रति १ रूपयात खायला घालतात.


२०१९ मध्ये आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले होते, ज्यात त्यांनी इडली अम्माला एलपीजी कनेक्शन देण्याविषयी सांगितले होते. आजीचे लक्ष उद्योजकांच्या या ट्विटने वेधून घेतले आणि भारत गॅस कोयंबटूरने त्यांना एलपीजी कनेक्शन जोडून दिले.

त्यानंतर ट्विट करत आनंद महिंद्रांनी हे आश्चर्यकारक असून कमलाथल यांना भारत गॅस कोयंबटूर यांनी गॅस भेट दिल्याबद्दल धन्यवाद. जसे मी आधीच सांगितले आहे की, एलपीजी वापरण्याच्या त्याच्या सततच्या खर्चाचे समर्थन केल्याबद्दल मला आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले होते.


आनंद महिंद्रांनी आज सकाळीच ट्विट केले आहे. कमलाथल यांच्या व्यवसायात गुंतवणूक करणे सगळ्यात उत्तम ठरेल. प्राथमिकता घर किंवा कार्यक्षेत्र आहे. ज्या ठिकाणी त्या जेवण बनवू शकतात आणि इडली विकू शकतात. याची जाणीव झाली त्यानंतर महिंद्रा समुहाने त्यांच्या नावावर जमीन रजिस्टर करण्यास मदत केली आहे.

लवकरच त्यांच्या घराचे बांधकाम महिंद्रा ग्रुपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस सुरू करणार आहे. यांसदर्भात आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत सांगितले की, जलद गतीने जमीन नोंदवून आमचा १ मैलाचा दगड गाठण्यात मदत केल्याबद्दल थोंडमुथुर येथील नोंदणी कार्यालयाचे आभार. कमलाथल यांना एलपीजीचा पुरवठा केल्याबद्दलही त्यांनी भारत गॅस कोयंबटूरचे आभार मानले आहेत.