राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप, तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद


पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर एका महिलेचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.

पीडित महिलेने आरोप करताना, विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडीओ तयार केले. माझ्यावर वर्षभरापासून अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्याविरोधात गुन्हा दाखल होणार नसल्याचे राजेश विटेकर म्हणतात, असा केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला. तत्पूर्वी तृप्ती देसाई यांनी आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार. तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद, अशी फेसबुक पोस्ट लिहून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.