करोना पार्श्वभूमीवर हरिद्वार महाकुंभ सुरु

हरिद्वार येथे महाकुंभ मेळा १ एप्रिल पासून सुरु होत असून तो ३० एप्रिल पर्यंत चालणार आहे. या महाकुम्भासाठी उत्तराखंड सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. गंगा स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना ७२ तासातले करोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक केले गेले आहे. ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नाही त्यांना रेल्वे स्टेशन. बस स्थानके, राज्याच्या सीमेवरच कोविड टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. विशेषता करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश सारख्या १२ राज्यातून येणाऱ्या भाविकांवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.

यासाठी ३३ दक्षता टीम तयार केल्या गेल्या आहेत. भाविकांना हॉटेल, धर्मशाळेत सुद्धा कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. त्यातूनही जर कुणी पोझिटिव्ह असेल तर त्याला कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात राहावे लागणार आहे. ३३ टीम पैकी १० खासगी तर २३ सरकारी पथके आहेत. दररोज १० हजार रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. सोशल डीस्टन्सिंग, मास्क यांचे काटेखोर पालन करावे लागणार आहे. ज्या भाविकांनी वेबसाईट वरून नोंदणी केली आहे त्यांना थेट प्रवेश दिला जाईल मात्र बाकीच्यांना तपासणी करून घेतल्यावरच प्रवेश मिळणार आहे.

शाही स्नानासाठी ६५ वर्षांवरील भाविकांना परवानगी दिली गेलेली नाही.