तेवा इंडियाकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दीड कोटींची मदत


मुंबई : तेवा एपीआय इंडिया (वॉटसन फार्मा प्रा.लि.) यांच्याकडून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा मदत निधी देण्यात आला. निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, तेवा एपीआय इंडियाचे प्रमुख दीपक शुक्ला, संचालक प्रसाद शिवलकर, सीएफओ प्रमोद घोरपडे आदी उपस्थित होते. मूळची इस्त्राइल येथील तेवा फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज कंपनी ही भारतातील औषध निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे.