२३ मे ला होणार पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा


पुणे – येत्या २५ एप्रिलला होणारी इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात एक नवे परिपत्रक जारी करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी या परीक्षा २३ मे ला होणार असल्याचे घोषित केले आहे. आवेदनपत्रे भरण्यास १० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२५ एप्रिलला इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीची पू्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा होणार होती. एकाच दिवशी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी यासंदर्भात एक नवे परिपत्रक जारी केले आहे. ही परीक्षा आता २३ मे रोजी घेण्यात येणार आहे. तसेच आवेदनपत्र भरण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. १० एप्रिलपर्यंत आता शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार आहे.