मुंबई पोलिसांची संचारबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही जमावबंदी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लागू असणार आहे. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू झाले हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. मुंबईत जमावबंदीचे काटेकोरपण पालन केले जावे यासाठी मुबंईत ठिकठिकाणी रात्री पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत देखील नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी परतण्याचे आवाहन केले जात होते.