असा आहे आपल्या आवडत्या बर्गरचा इतिहास

burger
‘बर्गर’ या पदार्थाचे नाव ऐकताच लहान मुलांपासून त्यांच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांकडूनच पसंतीची पावती मिळते. ‘बर्गर किंग’, ‘मॅक-डोनाल्डस’ सारख्या फास्ट फूड चेन्सपासून अगदी शाळा-कॉलेजच्या उपाहारगृहामध्ये मिळणारा, किंवा रस्त्याच्या कडेला एखाद्या ठेल्यावर मिळणारा बर्गर देखील अत्यंत चवीने खाल्ला जात असतो. आजच्या आधुनिक आणि धावत्या जीवनशैलीचा भाग असलेल्या फास्टफूड मधला बर्गर हा बहुतेकांचा, आवडीचा पर्याय आहे. असा हा बर्गर गेल्या काही दशकांपासून आपल्या परिचयाचा असला, तरी याचा इतिहास मात्र प्राचीन आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वी मंगोल प्रांतामध्ये हा पदार्थ अस्तिवात असल्याचे अनेक पुरावे इतिहासकारांना आणि खाद्यसंस्कृती विशेषज्ञांना सापडले आहेत.
burger1
‘द वर्ल्ड इज युअर बर्गर’ या डेव्हिड मायकल्स लिखित पुस्तकामध्ये बर्गरच्या इतिहासाचे विवरण दिलेले आहे. बर्गरचा विकास केवळ एक अन्नपदार्थ म्हणून नाही, तर एक विचारधारा म्हणून झाला असल्याचे या पुस्तकामध्ये म्हटलेले आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार ‘बर्गर’ हा पदार्थ सर्वप्रथम रोममध्ये तयार करण्यात आला. त्याकाळी या पदार्थाला ‘आयसिसिया ओमेंतेता’ या नावाने ओळखले जात असे. हा खाद्यपदार्थ आजच्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या हॅमबर्गरशी मिळता जुळता होता. खिमा, काळी मिरी, बदाम, आणि वाईन घालून या प्राचीन पदार्थाचे सारण तयार केले जात असे.
burger2
बर्गरचा उल्लेख मंगोलियन खाद्यसंस्कृतीमध्येही सापडतो. तेराव्या शतकाच्या काळामध्ये हा पदार्थ मंगोल प्रांतामधील स्थानिकांच्या आहाराचा भाग असल्याचे म्हटले जाते. अठराव्या शतकामध्ये ‘बर्गर’ची कल्पना युरोपमध्ये पोहोचली, आणि त्यानंतर ही कल्पना अतिशय लोकप्रिय होऊन तिला ‘हॅमबर्ग’ असे नाव देण्यात आले. या पदार्थ तयार करण्याची पद्धत मूळ रोमन पद्धतीप्रमाणेच असली, तरी यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये आणखी विविधता आली. ‘हॅमबर्ग’ बनविण्यासाठी सॉसेज वापरले जाऊ लागले. तसेच या पदार्थाबरोबर टोस्ट सर्व्ह केला जाऊ लागला. कांदा, मांसाहारी सॉसेज किंवा कटलेटच्या जोडीने इतर भाज्या, सॉसेस आणि मसाल्यांचा वापर करून तयार होणारा ‘हॅमबर्ग’ १८०२ साली ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट झाला.
burger3
आताच्या काळामध्ये आपल्याला पहावयास मिळते ते बर्गरचे आधुनिक रूप १८४५ साली अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतामध्ये अस्तित्वात आले. १८८५ साली मोठ्या बनमध्ये मांसाहारी कटलेट, भाज्या घालून बर्गर बनविण्याची कल्पना न्यूयॉर्कच्या एका जत्रेमध्ये ‘मेचेस ब्रदर्स’ रेस्टॉरंटने सर्वप्रथम आणली. त्यानंतर अमेरिकेतील विस्कोन्सिन शहरामधील चार्ली नाग्रीनने या पदार्थामध्ये थोडा बदल करून याला नवे रूप दिले, आणि पूर्वीचा ‘हॅमबर्ग’ आता ‘हॅमबर्गर’ म्हणून लोकप्रिय होऊ लागला. जसजसा हा पदार्थ लोकप्रिय होऊ लागला, तसतसे या पदार्थामध्ये आपल्या कल्पकतेनुसर आणि आवडीनुसार बदल करीत अनेक लोकांनी या पदार्थाची विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. कोणी पोळीमध्ये (tortilla) सॉसेज आणि भाज्या लपेटून बर्गर बनवू लागले, तर कोणी यामध्ये भरपूर लोणी व चीझ घालून हा पदार्थ अधिक चविष्ट बनविला.
burger4
‘मॅकडोनाल्डस’ या फास्ट फूड चेनची स्थापना १९४८ साली कॅलिफोर्निया येथे झाली, आणि पाहता पाहता ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड चेन बनली. त्यानंतर १९५४ साली फ्लोरिडातील मायॅमी येथे पहिले ‘बर्गर किंग’ स्थापित झाले आणि या दोन्ही फास्ट फूड चेन्सने पाहता पाहता बर्गर हा पदार्थ घराघरात नेऊन पोहोचवि

Leave a Comment