खास माझा पेपरच्या वाचकांसाठी ७ होळी स्पेशल गाणी

holi
बॉलिवूड चित्रपटातील गाणी आणि रंगपंचमीच्या उत्सवाचे जवळचे नाते आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. जशी रंगपंचमी जवळ येते तशी आपल्या ओठांवर रंगपंचमीची गाणी यायला लागतात. होळीच्या आधीपासून रंग खेळण्याचा फिव्हर सर्वांवर चढलेला असतो. यात सर्वात जास्त जर जय्यत तयारी केली जात असेल तर ती आहे होळी स्पेशल गाण्यांची. वर्षानुवर्षे तीच जुनी गाणी आजही लोकांच्या मनात घर करून असल्यामुळे आजही ‘रंग बरसे’पासून रंग खेळायला सुरूवात होते. तर आणखीही काही जुनी-नवी गाणी गाणी ऎकायला मिळतात. अशीच सात टॉप होळी स्पेशल गाणी आम्ही फक्त माझा पेपरच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

‘बागबान’ या चित्रपटातील ‘होली खेले रघुवीरा’ हे अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेले गाणं. अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे’नंतर हे गाणंही चांगलीच लोकप्रिय आहे. आजही होळी रंगात रंग भरण्यासाठी हे गाणं वाजवले जाते.

होळी आली फक्त नवीनच नाहीतर जुनी गाणीही तितकीच आवडीने वाजवली जातात. त्यात ‘आज ना छोडेंगे’ या गाण्याचाही समावेश आहे. राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून ‘कटी पतंग’ या चित्रपटातील हे गाणे आहे.

अमिताभ बच्चन, रेखा, जया भादुरी अशा स्टारकास्टने सजलेल्या सिलसिला या चित्रपटातील ‘रंग बरसे’ हे गाणं गेली कित्येक वर्ष गाजत आहे. रंगपंचमी आणि हे गाणं जणू समीकरणच झाले आहे. या गाण्याशिवाय रंगपंचमी पूर्णच होऊ शकत नाही.

शाहरूख खान, चुही चावला यांच्या ‘डर’ या चित्रपटातील हे गाणंही चांगलेच लोकप्रिय आहे. याच चित्रपटाने शाहरूख खानला सुपरस्टार केले होते. त्याच चित्रपटातील हे गाणे होळीला सगळीकडे वाजताना ऎकायला मिळते.

‘शोले’ या सिनेमातील ‘होली के दिन’ हे गाणं सुद्धा होळीच्या टॉप गाण्यांमध्ये आहे. या सुपरडुपरहिट चित्रपटातील गाण्याने आजही अनेकांना वेड लावले आहे.

अक्षय कुमार याच्या ‘वक्त’या चित्रपटातील हे गाणं आहे. आजच्या तरूण पिढीला हे गाणं चांगलेच पसंतीस उतरते.

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोन यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील हे गाणं तरूणाईच्या मनात घर करून आहे. काही जुनी तर काही नवीन गाणी आजही होळीला ताल धरण्यासाठी वाजवली जातात.

Leave a Comment