क्रिकेटच्या देवाला कोरोनाची लागण


मुंबई : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्याने स्वतः आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केल्याचीही माहिती दिली आहे. तसेच घरातील इतर सर्वांच्या कोरोना चाचण्या या निगेटिव्ह आल्याचेही सचिनने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.


सचिनने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, आम्ही सर्वजण व्यवस्थित आहोत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत. सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सचिनने आभार मानले आहेत. सचिननं नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग घेतला होता. यात सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. सचिनने देखील या मालिकेत चांगली कामगिरी केली होती.