विमाधारक आता अटी न आवडल्यास १५ दिवसांत रद्द करु शकतात पॉलिसी


नवी दिल्ली – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमाधारकांना दिलासा देणारी गुड न्यूज दिली आहे. कारण आयआरडीएआयने आता पॉलिसी खरेदीदारांना काही अतिरिक्त अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर २३ मार्च रोजी एक परिपत्रक आयआरडीएआयने जारी केले असून त्या परिपत्रकानुसार पॉलिसी खरेदी करणार्‍या व्यक्तीला जर ‘स्टँडर्ड पर्सनल अपघाताच्या अटी मान्य किंवा आवडल्या नसतील किंवा त्याद्वारे त्याची आवश्यकता पूर्ण होत नसेल, तर पॉलिसी खरेदीच्या 15 दिवसांच्या आत ग्राहक पॉलिसी परत करू शकतो, असे आयआरडीएआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

अटी व शर्तींचा पॉलिसी खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला आढावा घेण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी मिळेल, असे आयआरडीएआयने स्पष्ट केल्यामुळे आता विमा खरेदीदाराला जर अटी मान्य नसतील, तर तो १५ दिवसांमध्ये पॉलिसी परत करु शकणार आहे. या पंधरवाड्याला ‘फ्री लूक पीरेड’ नाव देण्यात आले आहे.

आयआरडीएआयने फेब्रुवारीमध्ये स्टँडर्ड पर्सनल अपघात कव्हरसाठी मार्गदर्शक सूचना देताना फ्री लूक पीरेडबाबत माहिती दिली नसल्यामुळे खरेदीदाराला पॉलिसीच्या अटी आवडल्या नाहीत तर काय होणार? ‘फ्री लूक पीरेड’मध्ये पॉलिसी रद्द करण्याची संधी त्यांना मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

पण, आयआरडीएआयने आता स्पष्ट केले आहे की, ‘फ्री लूक पीरेड’चा फायदा केवळ नवीन पॉलिसी खरेदीदारांनाच होईल, याचा फायदा पॉलिसी नुतनीकरण करणाऱ्यांना होणार नाही. शिवाय, जर ‘फ्री लूक पिरेड’मध्ये जर विमाधारकाने कोणताही दावा केला नाही, तर विमा कंपनीकडून केलेल्या आरोग्य तपासणीचे पैसे परत केले जातील. तसेच मुद्रांक शुल्कही परत केले जातील, असेही आयआरडीएआयने नमूद केले आहे.. दरम्यान, ‘फ्री लूक पिरेड’ची तरतूद बहुतेक विमा पॉलिसींमध्ये असते, त्यामुळे आपल्याला विशिष्ट कालावधीत पॉलिसी परत किंवा रद्द करण्याचे स्वातंत्र्य मिळते.