पुण्यातील शिवाजीनगर येथे ‘सारथी’ला जागा देण्यास मान्यता


मुंबई – पुण्यातील शिवाजीनगर येथील जागा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेस (सारथी) उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शिवाजीनगर पुणे येथील (नगर भूमापन क्र.173 ब/1 मधील जागेपैकी) आगरकर रस्त्यावरील शालेय शिक्षण विभागाची 4 हजार 163 चौ.मी. इतकी जागा सारथीला देण्यात येणार आहे. या ठिकाणी सारथीचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल इ. सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. शासकीय जागा वाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तींच्या अधीन राहून महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किंमतीने ही जागा देण्यात देण्यात येणार आहे.