धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण


मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती स्वतः मुंडे यांनी ट्विट करुन दिली आहे. याआधी मुंडे यांना गेल्या वर्षी जूनमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनावर मात करून ते राजकारणात सक्रियदेखील झाले होते.


दरम्यान धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये, माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.