कंगनाच्या थलाईवीचा ट्रेलर रिलीज


आज जयललिता यांचा बायोपिक ‘थलाईवी’चा ट्रेलर रिलीज झाला असून कंगनाचा यामध्ये हटके अंदाज दिसून येत आहे. हा ट्रेलर कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने रिलीज करुन अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना अनोखे गिफ्ट दिले आहे.

हा ट्रेलर तीन मिनिटे 22 सेकंदाचा असून चित्रपटसृष्टीत जयललिता यांचे पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणे, तसेच देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. दमदार डायलॉग्सने ट्रेलरची सुरुवातच झाली आहे. या चित्रपटासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली असून जयललिता यांच्यासारखे दिसण्यासाठी 20 किलो वजनही वाढवले आहे.

येत्या 23 एप्रिल 2021 रोजी थलाईवी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अरविंद स्वामी एमजी आर यांची भूमिका साकारणार आहे. हा चरित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत, तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.