आणखी एका स्टार किडला लाँच करणार करण जोहर


बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सला प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने लॉन्च केले आहे. अलिकडच्या काळात करण जोहरच्या चित्रपटामधूनच चित्रपटसृष्टीतील बहुतेक कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता आणखी एका स्टार किडला करण जोहर पडद्यावर घेऊन येणार आहे. ही स्टार किड दुसरे कुणी नाही, तर संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर आहे.


आपल्या धर्म कॉर्नरस्टोन एजन्सीच्या माध्यमातून करण जोहर नवीन चेहऱ्यांची ओळख करून देतो. करण जोहरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा चित्रपट जुलै महिन्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शनायाचा व्हिडीओ धर्मा प्रोडक्शनने ट्विटर हॅण्डलवरही ट्विट केला आहे. शनाया लवकरच पडद्यावर पदार्पण करणार असल्याची माहिती ट्विटमधून देण्यात आलेली आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरवर नेपोटीझमचा आरोप झाला होता. त्यावरून सोशल मीडियावर करणला ट्रोलही करण्यात आले होते. सातत्याने होत असलेल्या ट्रोलिंगमुळे त्या काळात करण काही दिवस सोशल मीडियापासून दुर गेला होता. करणने फेब्रवारीमध्येही धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून चार चेहऱ्यांची ओळख करून दिली होती. या चार कलाकारांची झलक सोशल मीडियावरही शेअर करणने एक पोस्ट शेअर केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीत आम्ही नेहमीच नव्या चेहऱ्यांना पाठिंबा दिला आहे. मग तो दिग्दर्शक असो, अभिनेता असो की संगीतकार या सर्वांनी आता इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे करण त्यावेळी म्हणाला होता. करणने हे चेहरे नेपोटीझमच्या आरोपानंतर लाँच केले होते.