राजकोट – कोरोना संसर्गासंदर्भात गुजरातमधील एका भाजप आमदाराने एक अजब वक्तव्य केले आहे. अजब हे वक्तव्य राजकोट (दक्षिण) मदतदासंघाचे भाजप आमदार असणाऱ्या गोविंद पटेल यांनी केले आहे. भाजपचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
गुजरातचे आमदार महाशय म्हणतात; खूप मेहनती भाजप कार्यकर्ते असल्याने त्यांना कोरोनाचा लागण होत नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तुम्हाला वाटत नाही का?, पटेल यांनी हे वक्तव्य या प्रश्नाला उत्तर देताना केले आहे. जे खूप मेहनत करतात त्यांना कोरोनाची लागण होत नाही. भाजपचे कार्यकर्ते खूप मेहनत करता त्यामुळे भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे पटेल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मागील महिन्यामध्ये स्थानिक निवडणुकांसाठी प्रचार करताना कोरोनाझाला होता. त्याचबरोबरच राज्यामध्ये पक्षा संघटनेचे प्रमुख सी. आर. पाटील यांच्यासहीत सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. वडोदऱ्याचे भाजप खासदार रंजनबेन भट्ट यांनी शनिवारी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. उपचारांसाठी आपण रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचेही भट्ट यांनी सांगितले होते.