आता आईस्क्रीम खा आपल्या राशीनुसार !

ICE
काही ठिकाणी व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीची रास निश्चित केली जाते, तर काही ठिकाणी व्यक्ती जन्मली त्या वेळची ग्रहदशा पाहून त्यावरून व्यक्तीची रास ठरते. ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक राशीला अनुकूल रत्ने, रंग, त्या राशीच्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये सविस्तरपणे सांगितली गेली आहेत. ग्रहमानाचे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगले प्रभाव दिसून यावेत, व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्या व्यक्तीची रास लक्षात घेऊन त्यानुसार काही उपाय ज्योतिषशास्त्र सुचवत असते. विशिष्ट राशीच्या व्यक्तीने विशिष्ट रत्न परिधान करावे, विशिष्ट रंग परिधान करावेत, विशिष्ट देवतेची पूजा करावी, किंवा विशिष्ट राशीच्या लोकांशी विवाह करावा असे निरनिराळे सल्ले आपण अनेकदा ऐकले असतील.
ICE1
आपल्या राशीसाठी कुठले रत्न चांगले, कुठला रंग वापरणे चांगले हे सल्ले आपण ऐकले असले, तरी आपल्या राशीसाठी कुठले आईस्क्रीम चांगले यावर देखील ज्योतिषांनी संशोधन केले आहे ही बाब कदाचित आपल्याला ठाऊक नसेल. एमी झरनर आणि मॉन्टे फार्बर यांनी हे संशोधन केले असले तरी त्यांच्या या संशोधनाला अद्याप कोणताही वैज्ञानिक आधार नाही. कोणत्या राशीसाठी कोणते आईस्क्रीम योग्य हे सांगताना त्यांनी व्यक्तीच्या ‘सनसाईन्स’ म्हणजेच सूर्यराशींचा विचार केला आहे. एखाद्या व्यक्तीची सूर्यरास त्याच्या जन्मतारखेवरून ठरत असते.
ICE2
मेष राशीचा स्वामी मंगळ असून, या व्यक्तींसाठी मिंट चॉकोलेट चिप आईस्क्रीम चांगले ठरते, तर वृषभ राशीच्या लोकांसाठी ‘बनाना’, म्हणजेच केळ्याच्या फ्लेवरचे आईस्क्रीम चांगले ठरते. मिथुन राशीसाठी चविष्ट कॉफी आईस्क्रीम चांगले ठरते. हे आईस्क्रीम मिथुन राशीच्या लोकांच्या बुद्धीला सतत चालना देणारे ठरत असल्याचे या ज्योतिषद्वयाचे म्हणणे आहे. जरा ‘हटके’ फ्लेवर्सची आईस्क्रीम्स कर्क राशीच्या लोकांकरिता योग्य असून, यामुळे त्यांच्या मनावरील मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
ICE3
सिंह राशीचे लोक स्वभावाने आनंदी आणि उत्साही असल्याने एखाद्या चविष्ट बर्थडे केकसारखे आईस्क्रीम या लोकांसाठी चांगले, तर कन्या राशीच्या लोकांसाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर चांगला. व्हॅनीला किंवा चॉकोलेट आईस्क्रीम मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम असून, धनु राशीच्या लोकांसाठी ‘पीनट बटर’ किंवा ‘सॉल्टेड कॅरमेल’ फ्लेवरचे आईस्क्रीम जास्त चांगले असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. तूळ राशीचे लोक अतिशय संतुलित मनस्थिती असणारे असून, त्यांच्यासाठी व्हॅनीला फ्लेवर योग्य ठरतो, तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चॉकोलेट ब्राउनी आईस्क्रीम उत्तम असल्याचे समजते. कुंभ राशीसाठी ‘व्हॅनीला रिपल क्रीम’, तर मीन राशीच्या लोकांना गोड पदार्थांची आवड जास्त असल्याने त्यांच्यासाठी ‘प्रलाइन’ आईस्क्रीम जास्त चांगले ठरत असल्याचे एमी झरनर आणि फार्बर यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment