ही चित्रकार लहानपणापासून आपल्या कौशल्याच्या बळावर कमवीत आहे लाखो डॉलर्स

painter
अकीएन क्रामारिक या अमेरिकन तरुणीचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यामध्ये माउंट मॉरिसमध्ये झाला. अकीएन व्यवसायाने चित्रकार आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीपासून अकीएनची चित्रकलेमध्ये असणारी रूची तिच्या पालकांच्या लक्षात आली होती. अकीएनने चित्रकलेचे कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नसूनही तिची चित्रकला मोठमोठ्या नामवंत व्यावसायिक चित्रकारांना देखील भुरळ पाडेल अशी आहे. अकीएन उत्तम कवयित्री देखील आहे.
painter1
आपण चार वर्षांचे असताना येशू आपल्याला वारंवार दृष्टांत देत असल्याचे अकीएनचे म्हणणे आहे. त्यामुळेच कदाचित वयाच्या आठव्या वर्षी काढलेले ‘प्रिन्स ऑफ पीस’ नामक चित्र तिने काढलेल्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक आहे. चित्रकला ही अकीएनसाठी केवळ आवड राहिली नसून, त्याद्वारे तिला उत्तम मिळकत होत आहे. तिने रेखाटलेल्या एका चित्राची किंमत हजारो डॉलर्सच्या घरामध्ये असते. अकीएनचा हा व्यवसाय सांभाळण्यात तिचे आई, वडील आणि भाऊ सर्वच जण गुंतलेले असतात.
painter2
अकीएनच्या चित्रांची किंमत ठरविणे, त्यांची विक्री, अशी कामे तिच्या घरातील प्रत्येकाने वाटून घेतली आहेत. तिची पेंटींग्ज विकल्याने या परिवाराला एका महिन्यामध्ये साधारण १००,००० डॉलर्सची मिळकत होत असते. अकीएनने चितारलेल्या एक ओरिजिनल पेंटिंगची किंमत साधारण १००,००० ते ३००,००० डॉलर्सच्या घरात असते, आणि तिच्या पेंटींग्जना असणारी मागणीही दिवसेंदिवस वाढत असते. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये पाईन झाडांच्या वनराईमध्ये उभ्या असलेल्या घोड्याचे अकीएनने काढलेले चित्र १७५,००० डॉलर्सच्या किंमतीमध्ये विकले गेले होते.
painter3
अकीएनची चित्रकलेकडे असणारी ओढ ती चार वर्षाची असल्यापासूनच दिसू लागली होती. वयाच्या पाचव्या वर्षीपासून अकीएनने स्केचेस काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्यामध्ये असलेली कलेची समज एखाद्या मोठ्या चित्रकाराइतकीच अफाट होती. वयाच्या आठव्या वर्षीपासून अकीएनने उत्कृष्ट पोट्रेट बनविण्यास सुरुवात केली होती. तिने बनविलेल्या चित्रांच्या कल्पना तिला नेमक्या कशा सुचतात असा प्रश्न तिला नेहमी विचारला जातो. मात्र यावर तिचे उत्तर अगदी साधे आहे. कल्पना कुठुन सुचते हे माहित नाही, पण जसजशी कल्पना डोळ्यांसमोर उलगडते, त्याप्रमाणे ती कल्पना कॅनव्हासवर उतरवित असल्याचे अकीएन म्हणते.

Leave a Comment