गायीपासून मिळणारे पंचगव्य आता जगातील सर्वात जास्त मागणी असलेल्या गोष्टींपैकी एक ठरण्याच्या मार्गावर असून, लवकरच सुप्रसिद्ध मुष्टीयोद्धा ‘द ग्रेट खली’ देखील याची गायीच्या शेणाच्या उपयुक्ततेची जाहिरात करताना पहावयास मिळणार असल्याचे वृत्त आहे. दिल्ली येथील ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी’ (आयआयटी)ला देशभरातील नामवंत संशोधन संस्थांच्या वतीने अनेक ‘प्रपोझल्स’ आली असून यांमध्ये ‘पंचगव्य’, म्हणजेच गोमुत्र, शेण, दुध, तूप आणि दही या गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तूंचे फायदे आणि उपयुक्तता यांवर अधिक संशोधन करण्याबाबतची ही प्रपोझल्स असल्याचे समजते.
गोमुत्राचे औषधी उपयोग सर्वश्रुत असून, याचा वापर अनेक औषधींमध्ये केला जातो. गोमुत्र वेदनाशामक असून, हे अतिशय प्रभावी प्रतिजैविक आणि रोगाणुनाशक आहे. हे ज्वरनाशी, अँटी फंगलही आहे. गोमुत्राचे सेवन हे शरीरासाठी एखाद्या औषधीसारखे काम करीत असून, याच्या जोडीने घेतलेल्या इतर औषधींची क्षमता ही वाढते. कर्करोगाच्या उपचारासाठी देखील गोमुत्र लाभदायक असल्याचे म्हटले जाते. तसेच लिव्हर, श्वसनाशी निगडित विकार व हृदयाशी संबंधित विकारांवरही गोमुत्र लाभदायक असल्याचे म्हटले जाते. गोमुत्र रक्तशुद्धी करणारे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे, आणि स्नायू व हाडांना पोषण देणारे आहे.
गायीचे शेण गंधक, सोडियम, मँगनीज, झिंक, फॉस्फोरस, नायट्रोजन यांसारख्या तत्वांनी परिपूर्ण असून, हे केवळ खत म्हणून नव्हे तर औषधी म्हणून ही फायद्याचे आहे. जर काम करीत असताना अचानक भाजले तर त्यावर गायीच्या शेणाचा लेप वेदनाशामक ठरतो. त्याचबरोबर पाय मुरगळला, त्यावर सूज आली, किंवा पडल्यामुळे शरीरावर एखाद्या ठिकाणी मुका मार लागला, तर गायीचे शेण एका कपड्यामध्ये बांधून त्याची पुरचुंडी तयार करावी. ही पुरचुंडी तव्यावर गरम करून मुका मार लागला आहे त्या ठिकाणी शेक घ्यावा. याने सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. गायीच्या शेणाचा लेप अनेक त्वचारोगांवरही उपयुक्त आहे. तसेच गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून त्याचा धूर केल्याने डासांचा नायनाट होतो.
गायीचे शेण (पंचगव्य) बहुगुणी, बहुउपयोगी
गायीचे दुध, दही आणि तूप आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असून, यांचे औषधी गुणही सर्वश्रुत आहेत. गायीचे दुध पचायला हलके आणि पौष्टिक आहे. गायीच्या दुधाने बनविले गेलेले तूप आहारासोबत अनेक घरगुती उपचारांसाठी देखील वापरले जाते. ताप आला असल्यास किंवा शरीरामध्ये वारंवार उष्णता होत असल्यास गायीच्या दुधाने किंवा तुपाने तळपायांची मालिश करावी. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते. सतत कॉम्प्यूटरचे काम केल्याने किंवा जास्त वाचन करावे लागल्याने डोळे थकतात, लाल होतात, डोळ्याची आगही होते. अशा वेळी गायीच्या दुधामध्ये भिजविलेल्या कापसाच्या पातळ पट्ट्या डोळ्यांवर ठेवल्याने आराम मिळतो.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही