नवी दिल्ली – स्ट्रिट फूड्स स्वस्तात आणि चांगले मिळतात म्हणून आपण ते आवडीने खायला जातो. पण ते कोणत्या पद्धतीने बनवतात कुठे बनवले जातात याची माहिती असायला हवी. कारण गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ हे घाणेरड्या जागी तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच असाच एक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे. त्यात एक व्यक्ती रोटी बनवत असून त्यावर थुंकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओ व्हायरल; दिल्लीत रोटी बनवतानाच त्यावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार
The #DelhiPolice (@DelhiPolice) have arrested two persons for allegedly spitting on a table used to make rotis in West #Delhi's Khayala area after a video of the incident went viral on social media. pic.twitter.com/tjnBo5xlCq
— IANS Tweets (@ians_india) March 18, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन व्यक्ती रोटी बनवण्यासाठी उभे आहेत. त्यामधील एक व्यक्ती दुसऱ्याला रोटी बनवण्यासाठी गोळे करुन देत असून दुसरा त्याची रोटी बनवताना दिसत आहे. पण रोटी बनवून झाल्यानंतर ती भाजण्यासाठी ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती त्यावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी देखील गाझियाबाद येथील भोजपुरमध्ये सुद्धा रोटी तंदुरमध्ये भाजण्यासाठी टाकण्यापूर्वी त्यावर जेवण बनवणारा थुंकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा प्रकार एका सामाजिक कार्यक्रमात घडला होता आणि त्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी व्यक्तीला अटक केली होती.