अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूजच्या ‘द बिग बुल’चा ट्रेलर रिलीज


नुकताच अभिषेक बच्चनच्या बहुप्रतिक्षित ‘द बिग बुल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर 3 मिनिट आणि 8 सेकंदाचा हा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटातील अभिषेक बच्चनचा लूक आणि स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे. त्याचबरोबर यात इलियाना डिक्रूझ पत्रकाराच्या भूमिकेत शोभून दिसत आहे. ‘द बिग बुल’ च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा अभिषेक बच्चनचा स्वॅग आवडला आहे. दुसरीकडे ट्रेलरमध्ये बरेच दमदार संवाद ऐकायला मिळत आहेत. यासह चित्रपटातील अभिषेक आणि इलियानाची केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली आहे.

युट्यूबर कॅरी मिनाटीच्या चाहत्यांसाठीही ‘द बिग बुल’चा ट्रेलर खूप खास आहे. या ट्रेलरच्या पार्श्वभूमीवर कॅरी मिनाटी यांचे ‘यल्गार’ गाणेही ऐकू येत आहे. काही काळापूर्वी कॅरीचे यल्गार हे गाणे प्रसिद्ध झाले होते, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते आणि यूट्यूबवर ट्रेंड झाले होते. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर यापूर्वी 16 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात मुंबईतील 1987 च्या सर्वात मोठ्या घोटाळ्याची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 8 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.