फाटक्या जिन्सच्या वादात कंगना राणावतची उडी, म्हणाली…


फाटक्या जिन्स प्रकरणामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणात आता अभिनेत्री कंगना राणावतने उडी घेतली आहे. कायम सामाजिक, राजकीय आणि चालू घडामोडींवर कंगना भाष्य करत असते. कंगना आता देखील फाटक्या जिन्स प्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तीरथ सिंह यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे.


पण फाटक्या जिन्स प्रकरणी अभिनेत्री कंगनाने वेगळ्या अंदाजात स्वःताचे मत मांडले आहे. ती म्हणाली, तुम्हाला जर रिप्ड जिन्स घालायची असेल तर सुनिश्चित करा की त्यामध्ये कुलनेस तेवढीच असावी, जेवढी फोटोंमध्ये दाखवली आहे. ज्यामध्ये तुमच्या स्टाईलची झलक दिसेल आणि तुम्हाला भिकारी असल्यासारखे देखील वाटणार नाही.

शिवाय अनेक जण आजच्या काळात रिप्ड जिन्स घालतात, असे देखील ती म्हाणाली. कंगनाने स्वतःचे रिप्ड जिन्समधील फोटो शेअर करत मत मांडले आहे. दरम्यान, तीरथ सिंह रिप्ड जिन्स घालणाऱ्या महिलांवर टीका केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.