नासाने बनविले जगातील सर्वात ताकदवान रॉकेट

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने १.३५ लाख कोटी खर्चून स्पेस लाँच सिस्टीम रॉकेट- मेगा रॉकेट बनविले असून हे रॉकेट जगातील सर्वात ताकदवान रॉकेट असल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबर मध्ये हे रॉकेट लाँच केले जाणार असून सध्या त्याच्या जोरदार चाचण्या घेतल्या जात आहेत.

या रॉकेटची चारी आरएस -२५ इंजिन आठ मिनिटाकरता सुरु करण्याची चाचणी घेतली जात आहे. मिसिसिपी स्टेट स्पेस सेंटर मध्ये ही चाचणी होत आहे. यापूर्वी या रॉकेटचे टेस्टिंग अनेक कारणांनी पुढे ढकलले गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार नासा मानवरहित चंद्रस्वारीच्या तयारीत आहे. आर्टेमिस मिशन असे या मोहिमेचे नामकरण केले गेले आहे. भविष्यात याच्या माध्यमातून सिंगल ट्रीप मध्ये अंतराळवीरांना चंद्रावर पोहोचविले जाणार आहे. त्यासाठी ही जबरदस्त रॉकेट सिस्टीम उपयुक्त ठरणार आहे.