उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली अमिताभ बच्चन यांची नात !


महिलांच्या कपड्यांसंदर्भात उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी रिप्‍ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नाव्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी नाव्या नंदाने शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.

सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्‍क्रीनशॉट शेअर करत नाव्याने लिहिले आहे की, WTF, आमचे कपडे बदलण्याआधी तुम्हाला तुमची मानसिकता बदलायला हवी. मी अभिमानाने रिप्ड जीन्स घालणार आहे. मुख्यमंत्री आम्हाला चांगले वातावरण देऊ शकतात का? त्याचबरोबर तिने एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, मी माझी रिप्‍ड जीन्स घालणार, धन्यवाद. आणि या जीन्सला मी अभिमानाने घालणार, असे देखील तिने म्हटले आहे.