ऑस्कर पुरस्कार २०२१ च्या नामांकनाची घोषणा प्रियंका-नीकच्या घरातून होणार


ज्या क्षणाची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता जवळ आला आहे. यंदाच्या वर्षी ‘ऑस्कर पुरस्कार २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नामांकनाची घोषणा केली जाणार आहे.

यावर्षी कोरोना संकटामुळे या समारंभाला विलंब झाला. पण आता ‘ऑस्कर सोहळा २०२१’ ची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑस्कर नामांकनाची घोषणा निक जोनस आणि प्रियंका चोप्रा लंडन येथील त्याच्या घरातून करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हा समारंभ घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे.

Oscars.com च्या ग्लोबल लाईव्ह स्ट्रीम आणि Oscars.org वर प्रेक्षकांना हा सोहळा पाहता येणार आहे. याशिवाय हे अकादमीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब) देखील पाहता येईल.

नामांकनाची घोषणा २५ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून१९ मिनिटांनी केली जाईल. त्याचबरोबर ही घोषणा भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी केली जाईल. दोन भागात नामांकनाची विभागणी केली जाईल. पहिल्या भागात ९ श्रेणी असतील. यात सहाय्यक भूमिका, पोशाख डिझाइन, संगीत, अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, आवाज, लेखन आणि पटकथा अशा श्रेणींचा समावेश आहे.

तर दुसऱ्या भागाची घोषणा ही भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता केली जाणार असून, त्यात १४ श्रेणी असणार आहेत. ज्यात मुख्य अभिनेता-अभिनेत्री, चित्रपट संपादन, सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीसारख्या श्रेणींचा समावेश असेल.