तुम्ही करीत असलेले ‘मल्टी टास्किंग’ तुमच्यासाठी नुकसानकारक तर ठरत नाही ना?

diabetes

आजच्या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धा जास्त आणि वेळ कमी असल्यामुळे हाताशी उपलब्ध असलेल्या वेळातच जमेल तितकी कामे उरकणे हे आजचे जीवनसूत्र झाले आहे. ‘मल्टी टास्किंग’ची कार्यपद्धती अवलंबल्यामुळे कमी वेळामध्ये अनेक कामे करण्याचे कसब अंगी रुजत असले, तरी क्वचित हीच कार्य पद्धती नुकसानकारकही ठरू शकते. अलीकडेच झालेल्या एका रिसर्च नुसार सातत्याने मल्टी टास्किंग करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक क्षमता कमी होत जात असल्याचे आढळले आहे. अश्या व्यक्तींना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कालांतराने कठीण वाटू लागते. तसेच अनेकदा सारासार विचार करण्याची शक्तीही या व्यक्तींमध्ये कमी होताना आढळते. सातत्याने कामे पूर्ण करण्याच्या तणावामुळे या व्यक्ती सतत चिडचिड्या होऊ लागतात.

diabetes2
ज्या व्यक्ती सातत्याने मल्टी टास्किंग करीत असतात त्यांची ‘वर्किंग मेमरी’, म्हणजेच एखादे काम करीत असताना त्या कामाशी निगडीत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता, व ‘लॉंग टर्म मेमरी’, म्हणजेच एखाद्या गोष्टीशी संबंधित तथ्ये दीर्घ काळाकरिता लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होत असल्याचेही या रिसर्च मध्ये म्हटले आहे. तसेच ज्या व्यक्ती सातत्याने मल्टी टास्किंग करतात त्यांच्यावर ठराविक काळामध्ये कामे पूर्ण करण्याचे प्रेशर इतके जास्त असते की त्यापायी कामांमध्ये लहान मोठ्या चुका करणे, काही कामांचा अजिबात विसर पडणे अशा गोष्टीही घडू लागतात.

diabetes1
मल्टी टास्किंग मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळेचे उत्तम नियोजन अतिशय महत्वाचे आहे. तसेच आवश्यक कामे कोणती आणि कोणती कामे जरा थांबून केल्याने चालतील अशा पद्धतीने कामांचे वर्गीकरण करून त्यानुसार कामांचा आराखडा आखणे योग्य ठरते. कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असले तरी शरीराला आणि मनाला विश्रांती देखील तितकीच आवश्यक आहे. त्यामुळे कामाच्या गडबडीतही मनावरील तणाव दूर करण्यासाठी आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणे आणि विश्रांती घेणेही अगत्याचे आहे.

Leave a Comment