भारतातील सर्वात गहिऱ्या आणि विशालकाय गुहा – बोरा केव्ह्ज

caves
भारतामध्ये निरनिराळ्या प्रांतांमध्ये अस्तित्वात असलेल्या गुफांमध्ये बोरा केव्ह्ज या सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक गहिऱ्या अशा गुहा असून, या गुहांचे निर्माण हजारो वर्षांपूर्वी झाले असल्याचे म्हटले जाते. आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅलीमध्ये या गुहा आहेत. समुद्रसपाटीपासून चौदाशे मीटर उंचीवर असलेल्या या गुहा पुरातत्ववेत्त्यांच्या साठी संशोधनच्या विषय ठरल्या आहेत.
caves1
पुरातत्ववेत्त्यांना या गुहांमध्ये पाषाणांपासून तयार केली गेलेली अनेक प्राचीन हत्यारे सापडली आहेत. ही हत्यारे सुमारे तीस ते पन्नास हजार वर्षांपूर्वीची असावीत असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. या हत्यारांच्या सापडण्यावरून या परिसरामध्ये हजारोवर्षांपूर्वी मानवी वस्ती असल्याचे निश्चित निदान पुरातत्ववेत्त्यांनी केले आहे. या परिसरामध्ये असलेल्या हवामानाचा गुहांच्या अंतर्गत भागांवर फारसा परिणाम झालेला आढळत नाही. कितीही गरमी, ऊन असले, तरी या गुहांचा अंतर्गत भाग नेहमीच थंड असतो.
caves2
या गुहांमध्ये असलेले पाषाण निरनिरळ्या आकारांमध्ये कोरल्या प्रमाणे भासत असून, काही पाषाणांचा आकार एखाद्या देवतेच्या मूर्तीप्रमाणेही भासतो, तर काही पाषाणांचा आकार मानवी अवयवांच्या प्रमाणे दिसून येतो. जिथे नैसर्गिक प्रकाश अजिबात पोहोचू शकत नाही, अशा जगातील काही सर्वात गहिऱ्या गुहांमध्ये बोरा गुहांचा समावेश असल्याचे म्हटले जात असले, तरी या गुहांमध्ये एका विवक्षित ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत असल्याचे स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment