रिलेशनशिप मध्ये या गोष्टींच्या बाबतीत नको तडजोड

relationship
नाते पती-पत्नीचे असो, की मित्र-मैत्रिणीचे, यामध्ये समजूतदारपणा दोघांकडेही लागतो हे खरेच आहे. जर दोघेही समजूतदार असतील, तर नात्यातील अनेक तिढे सहज सुटत असतात. अनेकदा ही तिढे सोडविण्यासाठी दोघांपैकी कोणाला तरी तडजोड करावी लागत असते, माघारही घ्यावी लागत असते. त्यामुळे नात्याचा गोडवा टिकविणे शक्य होत असते. पण आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या नादामध्ये आपण सर्वच बाबतीत तडजोड तर करीत नाही, याची काळजी घेणे देखील आवश्यक ठरत असते. जर एखादी व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असेल तर ही नाते टिकवून ठेवण्याची जबाबदारी या नात्यामधील दोघांचीही असते. त्यामुळे हे नाते टिकवून ठेवताना काही गोष्टींच्या बाबतीत तडजोड केली जाऊ नये.
relationship2
जर एखाद्या रिलेशनशिपची नव्याने सुरुवात होत असेल, तर या रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच एकमेकांच्या प्रति ‘कमिटमेंट’ व्यक्त करणे हे शक्य होत नसते. पण ही रिलेशनशिप पुढे नेण्याच्या दृष्टीने किंवा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न दोघांच्या कडूनही केले जावेत. या बाबतीत तडजोड नसावी. रिलेशनशिप मध्ये असताना दोघांपैकी कोणी तरी एकचजण ही रिलेशनशिप टिकवून ठेवण्यासाठी हरप्रकारे तडजोड करीत असेल, व दुसरा रिलेशनशिपच्या बाबतीत फारच सहज, म्हणजे ‘casual’ असेल, तर असे नातेसंबंध फार काळ टिकून राहणे अवघड होऊन बसते. नातेसंबंध कसेही असोत, त्यामध्ये संवाद हा हवाच. आपल्या बाबतीत काही चांगले घडले असो, किंवा काही वाईट घडले असो, त्याबाबत आपल्या जोडीदाराशी चर्चा करणे महत्वाचे आहे. तसेच या विषयी झालेली चर्चा ही खासगी असून, याबाबतीत चारचौघात उल्लेख करणे आवर्जून टाळले जावे. आपल्या व्यक्तिगत बाबी जर चारचौघात चर्चिल्या जाण्याच्या बाबतीत तडजोड करू नये.
relationship1
रिलेशनशिप टिकून राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आवश्यक असतो. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असणे आणि सर्वच बाबतीत आपल्या जोडीदाराची विश्वासार्हता याबाबतीत तडजोड कधीच असू नये. तसेच आपल्या नातेसंबंधांचे चित्र स्पष्ट असावे. एकाचे आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम आणि जोडीदारासाठी मात्र दुसरी व्यक्ती केवळ त्याच्या फायद्यापुरती असे चित्र एखाद्या रिलेशनशिप मध्ये असेल, तर ही रिलेशनशिप टिकवून ठेवणे कालांतराने कठीण होऊन बसते. त्यामुळे रिलेशनशिपच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या ‘क्लॅरिटी’ विषयीही कोणतीच तडजोड किंवा गैरसमज नसावेत.
relationship3
आपल्यासाठी आपला जोडीदार महत्वाचा असतो. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त जर इतर गोष्टींना सातत्याने प्राधान्य मिळत असेल, तर नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होणे साहजिकच असते. म्हणूनच सातत्याने जोडीदाराखेरीज इतर मित्रमंडळींना दिले जाणारे प्राधान्य हे खुपणारे असते. मित्रमंडळी, इतर कामे महत्वाची असली, तरी जोडीदारासाठी देण्याचा वेळ जर या गोष्टींमध्ये खर्च घातला, तर वाद निर्माण होणारच. त्यामुळे जोडीदारासाठी द्यायचा वेळ हा त्याच्याचसाठी असावा. त्याबाबतीत तडजोड शक्यतो करू नये.

Leave a Comment