‘हे’ आहे जगातील सर्वात सुंदर सजविलेले बीच.

beach5

ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील सुप्रसिद्ध बॉन्डी बीच जगातील सर्वात सुंदर सजावट असणारा समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पहावयास मिळणारे ‘स्कल्प्चर बाय द सी’ हे सर्वात मोठे तऱ्हे-तऱ्हेच्या शिल्पांचे संग्रहालय मोफत पाहण्याची संधी पर्यटकांना या ठिकाणी मिळते.

beach

‘स्कल्प्चर बाय द सी’ हे नानाविध शिल्पांचे संग्रहालय जरा हटकेच म्हणावे लागेल. इथे सर्वप्रकारची शिल्पे पर्यटकांना पहावयास मिळत असतात. अगदी सुंदर, रेखीव मूर्तींपासून ते भल्या मोठ्या बर्गरची प्रतिकृती देखील या ठिकाणी पहावयास मिळते.

beach2

नाना तऱ्हेची आकर्षक शिल्पे बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेली आहेत. निसर्गाने आधीच सौंदर्याचे वरदान दिलेल्या या बीचची शोभा या शिल्पांमुळे अधिकच वाढली आहे. या बीचवर सुमारे शंभर शिल्पे असून, या कलाकृती पाहता पाहता सूर्यस्नानाचा आनंद हे पर्यटक घेत असतात.

beach3

अशाच प्रकारच्या शिल्पांचे प्रदर्शन येत्या मार्च महिन्यामध्ये पर्थ येथे सुरु करण्यात येणार आहे.

beach4

येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी, सुंदर समुद्रकिनारा, अथांग सागर , भरपूर सूर्यप्रकाश आणि या सर्वांच्या जोडीला उत्तमोत्तम कलाकृती पाहता येण्याचा आनंद काही औरच ठरत आहे.

Leave a Comment