सतत काय खावेसे वाटते हे सांगते आपल्या आरोग्याविषयी बरेच काही

food
आपला आवडता पदार्थ खाण्याची अनिवार इच्छा आपल्याला दिवसात कुठल्याही वेळेला, क्वचित अगदी मध्यरात्री देखील होऊ शकते. यालाच इंग्रजी भाषेमध्ये ‘क्रेव्हिंग्ज’ म्हटले जाते. आपली ही क्रेव्हिंग्ज आपल्या आरोग्याबद्दल खूप काही सांगत असतात. आपल्या शरीरामध्ये नेमक्या कोणत्या पौष्टिक तत्वाची कमतरता आहे, हे आपली क्रेव्हिंग्ज दर्शवित असतात. जर एखादी वस्तू खाण्याची वारंवार, अनिवार इच्छा होत असेल, तर हे लक्षण आपला आहार परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. ज्या आहारामध्ये सर्व पोषक तत्वे संतुलित मात्रेमध्ये असतात असाच आहार योग्य समजला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी क्रेव्हिंग्ज झालीच, तर त्याद्वारे आपले शरीर आपल्याला काय सांगत आहे याचा विचार करून आहारामध्ये आवश्यक ते बदल करणे अगत्याचे ठरते.

अनेक व्यक्तींना सतत चॉकोलेट्स खाण्याची अनिवार इच्छा होत असते. ही इच्छा होताच चॉकोलेट्स खाण्यास मिळाली तर ठीकच, पण चॉकोलेट्स उपलब्ध नसली, तर या व्यक्ती चिडचिड्या होतात, बेचैन होतात. मात्र या क्रेव्हिंग्जसाठी वारंवार चॉकोलेट्स न खाता आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असल्याची शक्यता लक्षात घेणे आवश्यक आहे. चॉकोलेट्सची क्रेव्हिंग नियंत्रित करण्यासाठी आपल्या आहारामध्ये सुकामेवा, ताज्या भाज्या आणि फळे समाविष्ट करावीत. चॉकोलेटचे सेवन ही क्वचित करावे, पण सामान्य चॉकोलेटच्या ऐवजी डार्क चॉकोलेटचा तुकडा क्वचित खावा.
food1
अनेकांना सतत गोड खावेसे वाटते. दिवसाच्या कोणत्याही वेळी, भूक असो नसो, काही तरी गोड खाण्याची क्रेव्हिंग होत असते. शरीरामध्ये क्रोमियम सोबतच कार्बन, फॉस्फरस, सल्फर आणि ट्रीप्टोफॅन सारख्या तत्वांची कमतरता असल्याचे हे लक्षण आहे. ही सर्व तत्वे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असून, सतत गोड खाण्याच्या ऐवजी भाज्या आणि इतर पदार्थांमधून ही तत्वे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात मिळतील याची खबरदारी घ्यावी. अनेक व्यक्तींना सतत ब्रेड, पास्ता, किंवा तत्सम मैद्याने बनलेले पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग होत असते. हे लक्षण शरीरामध्ये नायट्रोजनची कमतरता दर्शविते. ही कमतरता दूर करण्यासाठी आहारामध्ये मासे, चिया सीड्स, सफरचंद, नाशपाती हे पदार्थ समाविष्ट करावेत.
food2
ज्यांना सतत मसालेदार, चमचमीत तळलेले पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग होत असते, त्यांच्या दिवसभराच्या आहारामध्ये फ्रेंच फ्राईज, भजी, वडे, सामोसे असे पदार्थ हटकून आढळतात. हे क्रेव्हिंग आपल्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याचे सूचक आहे. अशा वेळी आपल्या आहारामध्ये दुध, आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. ज्यांना सतत चिप्स, पॉपकॉर्न अशा पदार्थांचे क्रेव्हिंग होते, त्यांच्या शरीरामध्ये क्लोराईड आणि सिलीकॉनची कमतरता असू शकते. हे क्रेव्हिंग महिलांच्या बाबतीत गर्भावास्थेमध्ये जास्त आढळून येते. तसेच मानसिक तणाव अधिक असल्यास किंवा शरीरामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्यास ही हे क्रेव्हिंग होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment