पॅकर्स-मूव्हर्सना अतिरिक्त टिप देताना करा या गोष्टींचा विचार

movers
घर किंवा ऑफिस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणे हलविण्याचे काम खूप तणावपूर्ण असते. या शिफ्टिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक लहान सहान गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. सामान कधी आणि कसे हलवायचे इथपासून नव्या ठिकाणी गेल्यावर सामानाचे अनपॅकिंग, ‘असेम्ब्लिंग’ आणि मांडामांड या सर्वच गोष्टींची काळजीपूर्वक आखणी करावी लागते. आजकाल मूव्हर्स आणि पॅकर्सची सुविधा बहुतेक सर्वच ठिकाणी सहज उपलब्ध असल्याने सामान पॅक करण्याचे, सामान हलविण्यासाठी मनुष्यबळ आणि वाहनाची व्यवस्था पाहण्याचे, व नव्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये सामान पोहोचवून ते ‘अनपॅक’ व ‘असेम्बल’ करण्याचे आपले कष्ट पुष्कळ अंशी कमी होतात. यासाठी अर्थातच आवश्यक ते चार्जेस भरत असताना टिप देण्याचीही पद्धत सर्वमान्य आहे. मात्र ही टिप देताना काही गोष्टींचा विचार करणे अगत्याचे ठरते.
movers1
घर किंवा ऑफिस शिफ्ट करताना त्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना टिप देण्याची पद्धत सर्वमान्य आली, तरी ही टिप किती द्यावी याचे कोणतेही ठरलेले मापदंड नाहीत. एकतर सामान हलविण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणारे शारीरिक कष्ट लक्षात घेता योग्य ती टिप दिली जावी, आणि त्याचबरोबर ती अवाजवी जास्तही असू नये असे आपल्याला वाटणे योग्यच असते. त्यामुळे आपल्या वस्तूंचे पॅकिंग कशा प्रकारे केले जाते, पॅकिंग करताना, शिफ्टिंग करताना आणि अनपॅकिंग करताना पॅकर्स कितपत काळजीपूर्वक करतात, शिफ्टिंग ठरल्या वेळेला व्यवस्थित होते किंवा नाही, यावर आपल्याला मिळालेल्या सर्व्हिसचा दर्जा ठरवून त्यानुसार कर्मचाऱ्यांना टिप देणे योग्य ठरते.
movers2
मुळात पकर्स-मूव्हर्स कंपनीला त्यांचे ठरलेले चार्जेस आपण देत असल्याने प्रत्यक्ष पॅकिंग आणि शिफ्टिंग साठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना टिप देण्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्नही अनेकांना पडतो. पण वास्तविक आपण पॅकर्स आणि मूव्हर्सना देत असलेल्या चार्जेसपैकी फार कमी वाटा या कर्मचाऱ्यांच्या हाती येत असतो. शिवाय पॅकिंग आणि शिफ्टिंगच्या कामामध्ये शारीरिक मेहनत भरपूर असल्यामुळे, आपल्याला त्यांनी केलेले काम पसंत पडल्यास त्यासाठी थोडा वरखर्च या कर्मचाऱ्यांना देणे अगत्याचे ठरत असते. मात्र पकर्स तर्फे पुरविली गेलेली सेवा जर आपल्या पसंतीस उतरली नाही, तर मात्र टिप न देण्याचा निर्णय योग्य ठरतो. पॅकर्स ठरल्या वेळी उपस्थित न होणे, सामानाचे अव्यवस्थित रित्या केलेले पॅकिंग, शिफ्टिंगच्या दरम्यान सामानाची मोडतोड अशा प्रकारांनी मनस्ताप झाल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. अशा वेळी टिप न देण्याचा निर्णय योग्य असतो.
movers3
पकर्स कर्मचाऱ्यांची सेवा पसंत पडल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याला किती टिप दिली जावी यासाठी काही निश्चित ठोकताळे नसले, तरी अतिशय बेसिक पॅकिंग आणि शिफ्टिंगसाठी माणशी शंभर ते दीडशे रुपये टिप देण्याची पद्धत सर्वमान्य आहे. मात्र आपल्या घरामध्ये अनेक वस्तू शिफ्टिंग पूर्वी ‘डिसमँटल’ करून शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा जोडायच्या असतील तर यासाठी मेहनत आणि वेळ अधिक लागतो. त्यामुळे टिप देताना या गोष्टीचा विचार करणेही आवश्यक ठरते. त्याचबरोबर एकूण किती वस्तू पॅक कराव्या लागल्या, यातील किती वस्तू अवजड आहेत, तसेच आपल्याकडे असणाऱ्या नाजूक वस्तू हाताळताना आणि पॅक करताना कर्मचारी घेत असलेली काळजी या गोष्टीही टिप देताना विचारात घ्याव्यात.

Leave a Comment