मुंबई : नावनोंदणी धारक तथा नोंदणी धारक व्यवसाय करदात्यांनी आपला सन २०२०-२१ या वर्षाचा देय व्यवसाय कर ३१ मार्च २०२१ पूर्वी भरण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
सरकारचे व्यवसाय कर ३१ मार्चपूर्वी भरण्याचे आवाहन
नवीनच करपात्र झालेल्या करदात्यांनी कायद्याप्रमाणे नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नावनोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्र मिळवावे आणि सन २०२०-२१ या वर्षाचा देय व्यवसायकर ३१ मार्च २०२१ पूर्वी भरावा, असे महाराष्ट्र व्यवसाय कर विभाग यांनी कळविले आहे.