गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात सचिन वाझे यांची बदली


मुंबई : गुन्हे शाखेतून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली असून नागरी सुविधा केंद्रात वाझे यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून काल रात्री सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले. आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत सचिन वाझे कार्यरत होते.

पोलीस अधिकारी सचिन वाझे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहेत. जी स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांच्या मृत्यूचा संशंय विरोधी पक्षांनी थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे आणि त्यावरुन राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलेच पेटले आहे.