ही शिवलिंग वैज्ञानिकांसाठी देखील आहेत आश्चर्याचा विषय


अनके दैवी शक्ती आणि चमत्कारिक मंदिरे आपल्या देशात असून त्या मंदिरांची आपली स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. पण आपल्या देशातील उत्तर-प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेश या राज्यात एक-एक शिव मंदिर असे आहे, जे आपल्या चमत्कारामुळे वैज्ञानिकांसाठी देखील आश्चर्याचा विषय ठरले आहेत. या पाच मंदिरांमध्ये एक समान विशेषतः असून या पाचही शिवलिंगाचा आकार आपोआप वाढत आहे. या सर्व शिवलिंगाची मान्यता आणि कथा वेगवेगळी असून आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.

पौडीवाला शिव मंदिर हिमाचल प्रदेशातील नाहनपासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर आहे. रावणाशी या मंदिराचा संबंध असल्याचे मानले जाते. या शिवलिंगाची स्थापना रावणाने केल्याचे सांगितले जाते. स्वर्गाची दुसरी पौडी नावानेही याला ओळखले जाते. मान्यतेनुसार हे शिवलिंग प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला एका गव्हाच्या दाण्याएवढे वाढते. या शिवलिंगामध्ये साक्षात शिव विराजित असून ते भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे.

महादेवाची नगरी काशीमध्ये अनेक प्रसिद्ध शिव मंदिर आहेत. यामधील एक बाबा तीळ भांडेश्वर आहे. मान्यतेनुसार हे सतयुगात प्रकट झालेले स्वयंभू शिवलिंग आहे. हे शिवलिंग कलियुगापर्यंत तिळाच्या आकाराने वाढत होते. परंतु कलियुगाच्या आगमनानंतर लोकांना चिंता वाटू लागली की, हे अशाचप्रकारे दररोज वाढत राहिले तर संपूर्ण जग या शिवलिंगात सामावले. महादेवाची उपासना केल्यानंतर महादेवाने प्रकट होऊन हे शिवलिंग वर्षातून एकदा फक्त संक्रातीला वाढेल असे वरदान दिले. तेव्हापासून या शिवलिंगाचा आकार प्रत्येक संक्रांतीला वाढतो असे सांगितले जाते.

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मतंगेश्वर शिवलिंगाशी संबंधित मान्यतेनुसार येथे श्रीरामाने पूजा केली होती. 18 फूट उंच असलेले हे शिवलिंग दरवर्षी तिळाच्या आकाराएवढे वाढत जात असल्याचे सांगितले जाते.

गुजरातमधील गोध्रा येथील मृदेश्वर महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाच्या आकाराला प्रलयाचा संकेत मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित मान्यता आहे की, हे शिवलिंग ज्या दिवशी मंदिराच्या छताला स्पर्श करेल त्या दिवशी महाप्रलय येईल. शिवलिंगाचा छताला स्पर्श होण्यासाठी लाखो वर्ष लागतील कारण शिवलिंगाचा आकार एक वर्षात एका तांदळाच्या दाण्याएवढा वाढतो. या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे यामधून आपोआप एक जलधारा निघते आणि महादेवाचा अभिषेक करते.

छत्तीसगढ राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील मरौदा गावातील जंगलात एक नैसर्गिक शिवलिंग भूतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. हे विश्वातील एकमेव नैसर्गिक शिवलिंग मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित एक अनोखे रहस्य याचे महत्त्व आणखीनच वाढवते. रहस्यमय गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी या शिवलिंगाची उंची चमत्कारिक पद्धतीने वाढत आहे. लोकांच्या मनामध्ये या शिवलिंगाविषयी खूप श्रद्धा आणि आस्था आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथे होणारा चमत्कार. आपोआप हे शिवलिंग मोठे होत आहे. हे जमिनीपासून 18 फूट उंच आणि 20 फूट गोलाकार आहे. प्रत्येक वर्षी याची उंची मोजली जाते आणि यामध्ये 6 ते 8 इंच शिवलिंग वाढलेले आढळून येते.

Leave a Comment