मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून यासदंर्भात तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्रात जर कोरोनाचे रुग्ण वाढतच राहिले तर हा संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
कोरोना नियमावलीचे पालन केले नाही तर महाराष्ट्रासाठी तो दिवस दूर नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
आपल्या सीमा महाराष्ट्राने बंद केल्या आहेत आणि कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असे काही नसल्याचा इशारा राज्याचे कोरोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला आहे. सरकारने जर योग्य काळजी घेतली नाही आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांचे लोकांनी पालन केले नाही तर कोरोना इतर राज्यांमध्ये फैलावेल, तो दिवस दूर नसल्याचे म्हणत डॉ. साळुंखे यांनी गंभीरता सांगितली आहे.