आता अवलंब करू या ‘झीरो वेस्ट कुकिंग’ चा

cook
भारतामध्ये पिकविले जाणारे जवळजवळ चाळीस टक्के अन्न दर वर्षी वाया जाते, ज्या ठिकाणी अनेकांना एक वेळचे पोटभर अन्न मिळणे देखील दुरापास्त आहे, अश्या ठिकाणी हा आकडा विचार करायला लावणारा आहे. पण ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असले, तर याची सुरुवात आपल्यापैकी प्रत्यकाने आपापल्या घरापासूनच करायला हवी. यासाठी प्रत्येक अन्नपदार्थाचा व्यवस्थित वापर करायला हवा, जेणेकरून त्यातील कोणताही खाण्यायोग्य भाग वाया जाणार नाही. त्यामुळे झीरो वेस्ट कुकिंग चा प्रयोग प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून स्रुरू करण्याची कल्पना आपण आजमावून पहावयास हवी.
cook1
झीरो वेस्ट कुकिंग करण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकेल. ज्या भाज्या किंवा फळांच्या साली खाता येण्याजोग्या असतील, त्या भाज्यांवर किंवा फळांवर साले तशीच राहू द्यावीत. फळे किंवा भाज्या स्वच्छ धुवीन घेऊन या भाज्या सालीसकट शिजवाव्यात. अनेकदा सफरचंदासारखी फळे चकचकीत दिसावीत म्हणून त्यावर मेण लावले जाते. हे मेण आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. हे मेण हटविण्यासाठी सफरचंद किंवा तत्सम फळे गरम पाण्यामध्ये काही मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यामुळे मेण दूर झाल्याने सफरचंद सालीसकट खाता येऊ शकते. फळांच्या आणि भाज्यांच्या सालींमध्ये क्षार आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर असल्याने यांचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये अवश्य केला जावा.
cook2
गाजरे, बीट, मुळा तत्सम मूळ भाज्यांची पाने टाकून न देता त्यांचा उपयोग भाजीमध्ये, सूपमध्ये किंवा डाळींमध्ये करावा. तसेच या भाज्यांची देठे कापून ती मातीमध्ये किंवा कुंडीमध्ये पेरून ठेवल्यास पुन्हा फळतात. त्यामुळे ही देठे टाकून न देता त्यांचाही वापर करावा. संत्रे, मोसंबी, लिंबे यांच्या साली टाकून न देता त्या वाळवून त्यांची पावडर करून ठेवावी. ही पावडर अधूनमधून पाण्यामध्ये घालून उकळून घेऊन या काढ्याचे सेवन करावे. याच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर डी-टॉक्सिफाय होण्यास मदत होते. ज्या सालीची पूड करता येणार नाही, त्या साली पाण्यामध्ये उकळून घेऊन त्या काढ्याचे सेवन करता येऊ शकेल.

काही फळांच्या किंवा भाज्यांच्या बिया खाता येण्याजोग्या असतात, त्यामुळे यांचे सेवन अवश्य करावे. या बियांमध्ये जीवनसत्वे आणि इतर पौष्टिक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. फणसाच्या आठळ्या, पपईच्या बिया, भोपळ्याच्या बिया खाता येण्याजोग्या आहेत. त्यामुळे या बिया टाकून न देता त्या उपयोगात आणाव्यात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment